Lalbaugcha Raja : नगर : गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) झाल्यानंतर गणेश मंडळांकडून मंडप वगैरे सोडण्याचे काम सुरु आहे. तसंच गणेश भक्तांनी पैसे, सोनं (Gold), चांदीच्या रुपात मिळालेल्या दानाची मोजदाद सुरु आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) मंडळाचेही दानाची मोजणी पूर्ण झाली आहे.
नक्की वाचा: अखेर आमदार अपात्रता प्रकरणाला मुहूर्त;’या’दिवशी होणार सुनावणी
लालबागच्या राजाच्या दर्शनाला फक्त राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशभरातून लोक येत असतात. लालबागच्या राज्याचा दर्शनाला फक्त सर्वसामान्यच नाही तर अनेक सेलिब्रेटी व राजकारण्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये अमित शाह, अंबानी, शाहरुख खान असे सर्व क्षेत्रातल्या दिग्ग्जचा समावेश आहे. यादरम्यान भक्तांकडून लालबागचा राजाला भरभरुन दान केलं जातं. गणेशोत्सव सुरु असतानाच या दानाची मोजदाद सुरु असते.
लालबागचा राजाला मिळालं ५ कोटींचे दान
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवात भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली आहे. भाविकांनी गणेशोत्सवातील ११ दिवसात लालबागचा राजाला ५ कोटी ६५ लाख ९० हजार रोख रुपये दान केले आहेत. तसंच ४१५१.३६० ग्रॅम सोने आणि ६४३२१ ग्रॅम चांदी दानरूपात जमा झाली आहे.
अवश्य वाचा: बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी
20 कोटींचा सोन्याचा मुकूट लॉकरमध्ये जमा
बुधवारी सकाळी विसर्जन करण्याआधी लालबागचा राजा गणपतीचा सोन्याचा मुकूट काढून घेण्यात आला. अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या या मुकूटाची किंमत जवळपास 20 कोटी रुपये आहे.