Lata Mangeshkar Award : अमिताभ बच्चन यांना यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

'गानसम्राज्ञी' दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे यंदाचे मानकरी भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन ठरले आहेत.

0
Lata Mangeshkar Award
Lata Mangeshkar Award

नगर : संगीत रंगभूमीवर ज्येष्ठ गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सन २०२२ पासून ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय या प्रतिष्ठानने घेतला. यंदा या विश्वस्त मंडळाने म्हणजेच पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या मुंबईतील ‘प्रभूकुंज’ या निवासस्थानी यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

नक्की वाचा : जोसबटलरची ‘रॉयल’ खेळी; दोन विकेट राखत राजस्थानचा विजय

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण (Lata Mangeshkar Award)

‘गानसम्राज्ञी’ दिवंगत लता मंगेशकर यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे यंदाचे मानकरी भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) ठरले आहेत. येत्या २४ एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८२ व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत मुंबईतल्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या पुरस्कार सोहळा होणार आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांच्यासह इतर दिग्गजांचा पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे. यावेळी, कला, संगीत, नाटक, वैद्यकीय, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातल्या दिग्गजांनाही ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त विकासकामे: विखे पाटील

विविध क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाणार पुरस्कार (Lata Mangeshkar Award)

बिग बी अमिताभ बच्चन यांना ‘लता मंगेशकर पुरस्कार’, संगीतकार ए.आर.रहमान यांना ‘मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’, मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’, पद्मिनी कोल्हापूरे यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ चित्रपट सेवा पुरस्कार, ‘अतुल परचुरे यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रदीर्घ नाट्यसेवा पुरस्कार’, बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा ला ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर उत्कृष्ट चित्रपट निर्मिती विशेष पुरस्कार’ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ‘गालिब’ या नाटकाला उत्कृष्ट नाट्यनिर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार, ‘दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल’ ला समाजसेवेसाठी आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार, प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी मंजिरी मराठे यांना ‘वाग्विलासिनी पुरस्कार’, रुपकुमार राठोड यांना प्रदीर्घ संगीत सेवा, तर भाऊ तोरसेकर यांना प्रदीर्घ पत्रकारितेसाठी गौरवण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या जोडीला मुंबईतल्या दीनानाथ मंगेशकर नाट्य गृहात ‘श्री शारदा विश्वमोहिनी लतादीदी’ ही सुरेल संगीत मैफल ही रंगणार आहे. दिवंगत लता मंगेशकर यांच्या गान कर्तृत्वाला त्यांचे बंधू, ख्यातनाम संगीतकार, गायक पंडित ह्रदयनाथ मंगेशकर हे या कार्यक्रमातून सांगीतिक मानवंदना देणार आहेत. अविनाश प्रभावळकर यांच्या ‘ह्रदयेश आर्टस्’ च्या वतीने संगीत रसिकांना हा सूर-तालाचा अनोखा नजराणा अनुभवायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here