Lawyer Couple Murder : नगर : राहुरी येथील ॲड. राजाराम आणि मनिषा आढाव दाम्पत्याचा खुनाच्या (Lawyer Couple Murder) अगोदर आरोपी किरण दुशिंग आणि शुभम महाडिक हे राहुरी न्यायालयात (Court) आले होते. राहुरी न्यायालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये दोन्ही आरोपी असल्याचे ॲड. आढाव यांचे सहकारी वकील रामदास बाचकर यांनी ओळखले.
नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?
ॲड. रामदास बाचकर यांची सरतपासणी
ॲड. राजाराम आणि मनिषा आढाव दाम्पत्याचा खून खटल्यात राहुरी न्यायालयात प्रॅक्टीस करणारे ॲड. रामदास बाचकर यांची सरतपासणी झाली. उलट तपासणीला सुरूवात झाली. परंतु, उलट तपासणी अपूर्ण राहिली.
अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे
ॲड. बाचकर यांनी सरतपासणीमध्ये सांगितले की, (Lawyer Couple Murder)
राहुरी येथील न्यायालयात २०१२ पासून प्रॅक्टीस करत असल्याने तेव्हापासूनच ॲड. राजाराम आढाव यांची ओळख झाली. ॲड. आढाव दाम्पत्याचा खून करण्यात आला. त्या दिवशी राहुरी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयास दाखविण्यात आले. त्यावेळेस आरोपी किरण दुशिंग आणि शुभम महाडिक हे न्यायालयात आले होते. त्यांनी ॲड. आढाव दाम्पत्याची भेट घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे रेकॉर्डिग असल्याचे ओळखले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपासणी घेतली.
आरोपींच्या वतीने ॲड. सतीश वाणी यांनी उलट तपासणीला सुरूवात केली. त्यांची उलट तपासणी ही अपूर्ण राहिली. या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी (ता.७) होणार आहे.