Lawyer Couple Murder : माफीच्या साक्षीदाराची मित्राकडे खुनाची कबुली; ॲड. आढाव दाम्पत्य खून खटला

Lawyer Couple Murder : माफीच्या साक्षीदाराची मित्राकडे खुनाची कबुली; ॲड. आढाव दाम्पत्य खून खटला

0
Lawyer Couple Murder : माफीच्या साक्षीदाराची मित्राकडे खुनाची कबुली; ॲड. आढाव दाम्पत्य खून खटला
Lawyer Couple Murder : माफीच्या साक्षीदाराची मित्राकडे खुनाची कबुली; ॲड. आढाव दाम्पत्य खून खटला

Lawyer Couple Murder : नगर : राहुरी (Rahuri) येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव दाम्पत्य (Lawyer Couple Murder) खटल्यातील माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याने मित्राकडे खुनाची (Murder) कबुली दिली. या कृत्याबद्दल पश्चताप होत असल्याची भावना व्यक्त केली, असे हर्षलचा मित्र अमोल भाऊसाहेब वाव्हळ यांनी सरतपासणीत सांगितले.

नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?

हर्षल ढोकणेच्या मित्राची सरतपासणी व उलट तपासणी

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयात राहुरी येथील ॲड. मनिषा आणि ॲड. राजाराम आढाव दाम्पत्याच्या खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. ॲड. राजाराम आढाव यांना ओळखणारे आणि राहुरी न्यायालयात प्रॅक्टीस करणारे ॲड. रामदास बाचकर यांची उलट तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे यांचा मित्र अमोल भाऊसाहेब वाव्हळ (रा. उंबरे, ता. राहुरी) यांची सरतपासणी आणि उलट तपासणी झाली.

अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे

अमोल वाव्हळने सरतपासणीत सांगितले की, (Lawyer Couple Murder)

उंबरे गावातील बसस्थानकावर ता.२६ जानेवारी २०२४ होतो, त्यावेळेस हर्षल ढाकणे तेथे आला. तो नैराश्यग्रस्त होता, त्यामुळे त्याला असे काय दिसतो, असे विचारले. त्यावर तो रडायला लागला. आपल्या हातून मोठे पाप घडले, असे म्हणून ॲड. आढाव दाम्पत्याला मारल्याची कबुली दिली. त्याचे सांत्वन करून घडलेली माहिती पोलिसांना सांगण्यास सांगितले.


आरोपींच्या वतीने ॲड. सतीश वाणी यांनी उलट तपासणी घेतली. अमोलला मोबाईलवर आलेल्या कॉलच्या अनुषंगाने माहिती मिळविली. आरोपींच्या अटकेनंतर या घटनेची माहिती समजली ? असे प्रश्न विचारण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे काम पाहत आहेत. माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणेच्या वतीने ॲड. परिमल फळे हे काम पाहत आहेत. ॲड. वाणी यांना ॲड. वैभव बागूल हे सहाय करत आहेत.