LCB | नगर : श्रीगोंदे (Shrigonda) तालुक्यातील घारगाव येथे रविवारी (ता. ६) पहाटे घरफोडीची घटना घडली होती. यात महिलेला मारहाण करत चोरांनी तिचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने आज जेरबंद केले. संदेश संजय भोसले (वय २०, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदे) व साहील सुनील चव्हाण (वय १८, रा. अनकुटे, ता. येवला, जि. नाशिक) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळ्याचा भीषण स्फोट;दोन अग्निवीरांचा मृत्यू
मंगळसूत्र हिसकावून नेले (LCB)
घारगाव येथील राजू जाधव यांच्या घरातील दरवाज्याचा कडीकोयंडा तोडत चोरांनी रविवारी (ता. ६) घरात प्रवेश केला. त्यांच्या पत्नीला मारहाण करत मंगळसूत्र हिसकावून नेले. या प्रकरणी त्यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.
अवश्य वाचा : रतन टाटांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी राज्य सरकारचा केंद्राला प्रस्ताव
आरोपींना घेतले ताब्यात (LCB)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पहाणी केली. तसेच परिसरातील आरोपींबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात माहिती घेतली. पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन मखरे यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा कोळगाव (ता. श्रीगोंदे) येथील संदेश भोसले याने केला आहे. तो व त्याच्या साथीदार पिंपळगाव पिसा येथे असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत अर्धा तोळा सोन्याचे डोरले आढळून आले. हा सुमारे ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. त्यांच्याकडे या मुद्देमाला बाबत अधिक विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना बेलवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.