LCB : अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण एलसीबीने घेतले ताब्यात

LCB : अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण एलसीबीने घेतले ताब्यात

0
LCB : अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण एलसीबीने घेतले ताब्यात
LCB : अहिल्यानगरमधील पोलीस कर्मचाऱ्याला पुणे ग्रामीण एलसीबीने घेतले ताब्यात

LCB : नगर : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत शिरूर शहरात १ किलोहून अधिक मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह (Drugs) गॅरेज चालकाला अटक (Arrest) करण्यात आली. या प्रकरणाला आता वेगळेच वळण घेतले असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील (Ahilyanagar District Police) एका पोलीस कर्मचाऱ्याशी निकट संबंध असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस खात्यातच खळबळ उडाली आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याला चौकशीसाठी पुणे ग्रामीण एलसीबीने (LCB) ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा: जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला; तरुण गंभीर जखमी

१८ जानेवारी रोजी मध्यरात्री छापा

नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी दिले होते. त्यानुसार १७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार शिरूर शहरातील डंबेनाला परिसरात राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख (वय ४१) हा बाबुरावनगर परिसरातील मोकळ्या मैदानात एमडी विक्रीसाठी येणार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन १८ जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात आला. छाप्यात आरोपीच्या ताब्यातून १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) व एक दुचाकी असा सुमारे २ कोटी १० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील या प्रभागात नोटाला मतदारांची पसंती

अहिल्यानगर पोलीस दलात खळबळ (LCB)

दरम्यान, या कारवाईनंतर तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, अटक करण्यात आलेल्या शादाब शेखचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याशी थेट संबंध असल्याचे उघड झाले आहे. सदर कर्मचारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत आहे. पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने त्या कर्मचाऱ्याला मंगळवारी (ता. २०) सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ड्रग्स तस्करी सारख्या गंभीर गुन्ह्यात पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याची भूमिका, आरोपीशी असलेले आर्थिक व संपर्कातील व्यवहार, तसेच ड्रग्स नेटवर्कमधील सहभाग याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अहिल्यानगर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.