LCB : गावठी कट्टा विक्रीसाठी आला अन् जेरबंद झाला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : गावठी कट्टा विक्रीसाठी आला अन् जेरबंद झाला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
LCB : गावठी कट्टा विक्रीसाठी आला अन् जेरबंद झाला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
LCB : गावठी कट्टा विक्रीसाठी आला अन् जेरबंद झाला; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

LCB : नगर: गावठी कट्टा (Illegal Weapon) विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे असा एकूण ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अक्षय राजेंद्र पायमोडे (वय २६, रा. प्रवरानगर, लोणी, ता.राहाता) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (Accused) नाव आहे.

नक्की वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू

६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार कोल्हार भगवतीपूर परिसरात गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीसार माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बेलापूर रोड परिसरात सापळा रचून आरोपीला गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. संशयित आरोपीकडून ४९ हजार रुपये किंमतीचा एक गावठी पिस्टल, दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस, १० हजार किमतीचा मोबाईल असा एकूण ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : पुणे अहिल्यानगर रेल्वेचा डीपीआर सादर खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याचे यश

लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (LCB)

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता अनिकेत देवेंद्र भोसले (रा.प्रवरानगर, लोणी, ता.राहाता) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, सुनील मालणकर व महादेव भांड यांच्या पथकाने केली.