LCB : नगर : कर्जत तालुक्यातील राशीन (Rashin) परिसरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २६ गोवंशीय जाणावांची सुटका स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने सुटका केली आहे. याबाबत १६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गट व गण रचना जुन्याच स्वरुपात ठेवावी; खासदार लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव (पूर्ण नाव माहित नाही, रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर), सचिन मोहन आढाव (रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर), बबलू उर्फ इरफान कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही), सादीक कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही, रा.कर्जत, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर), समीर कुरेशी (रा.कर्जत, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर) सर्व (पसार) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून आरोपींच्या ताब्यातून जनावरांची सुटका (LCB)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींच्या ताब्यातून जनावरांची सुटका केली. मात्र, संशयित आरोपींना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पसार झाले. याबाबत पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अरुण मोरे अशांचे यांच्या पथकाने केली.