LCB | नगर : गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी ‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’ कंपनीविरोधात दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी भुपेंद्र राजाराम सावळे (वय २७, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी, ता. राहाता) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने पोलिसांनीच माझ्याकडून १ कोटी ५० लाख रुपयांची ऑनलाईन लाच घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
हेही वाचा – मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर दारू पिऊन तरुणाचा राडा;नेमकं घडलं काय?
हे कर्मचारी निलंबित (LCB)
पोलीस उपनिरीक्षक तुषार छबुराव धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर सीताराम गोसावी, बापूसाहेब रावसाहेब फोलाणे, गणेश प्रभाकर भिंगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून होत आहे.
दीड कोटीची लाच मागितली (LCB)
ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. तपासादरम्यान, प्रमुख संशयित आरोपी भूपेंद्र सावळे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत त्याने शेअर बाजारातील नुकसानीमुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करता न आल्याचे कबूल केले. मात्र, त्याच वेळ त्याने स्थानिक गुन्हे शाखेतील एक अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांनी दीड कोटी रुपयांची लाच माझ्याकडून घेतली असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.
अवश्य वाचा – ‘सत्यभामा’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर प्रदर्शित;सती प्रथेवर आधारित चित्रपट
रस्त्यात अडवले (LCB)
भूपेंद्र सावळे हा १५ जानेवारीला नाशिककडे जात होता. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व तीन कर्मचाऱ्यांनी त्याला लोणीजवळ अडवले. आरबीआय लायसन्सशिवाय गुंतवणूक घेतल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्याच्याकडून दीड कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याने केला. तसेच, त्याला आणि त्याच्या भावांना जबरदस्तीने पोलीस अधीक्षक कार्यालयात नेण्यात आले व तेथेच एका विशिष्ट बँक खात्यावर ऑनलाईन पैसे वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. ही संपूर्ण रक्कम उपनिरीक्षक धाकराव यांनी दिलेल्या खात्यावर वर्ग झाल्याचे त्याने सांगितले.
त्यांची आता चौकशी (LCB)
दरम्यान, या आरोपांची गंभीरता लक्षात घेता उपनिरीक्षक धाकराव, कर्मचारी मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे हे करीत आहेत.