Legislative Council : नगर : राज्यात विधानपरिषदेच्या (Legislative Council) चार जागांवर निवडणूक (Election) होत आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील (Teachers Constituency) चार जागांसाठी १० जूनला मतदान होणार असून १३ जूनला मतमाेजणी आहे.
हे देखील वाचा : गरिबांचे आरक्षण हिसकावून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट; पंतप्रधान माेदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबाेल
१५ मे पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार
विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी ७ सदस्य शिक्षक, तर ७ सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीची प्रक्रिया १५ मे पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २२ मेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.
नक्की वाचा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २० मे पर्यंत वाढ
दाखल अर्जांची अर्जाची २४ मे रोजी होणार छाननी (Legislative Council)
इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी २४ मे रोजी होणार तर आहे. अर्ज मागे घ्यायचा असेल २७ मेपर्यंत उमेदवारांना अर्ज मगे घेता येणार आहे. चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. त्यात विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर (ठाकरे गट), निरंजन वसंत डावखरे – कोकण पदवीधर (भाजप), किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक (ठाकरे गट), कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक (लोकभारती) हे चार आमदार आहे.