Legislative Council : नगर : राज्यातील ४ विधानपरिषद (Legislative Council) मतदारसंघात निवडणूक होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी (Teachers Constituency) उद्या मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरू आहे. दरम्यान, येवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी (Police) उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना नाशिकच्या येवल्यात शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना ५ हजार रुपयांचे पॉकेट देताना कोल्हेंच्या समर्थकांना पकडले आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस देखील उपस्थित होते.
नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश
पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात (Legislative Council)
पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. पैसे वाटप करणारे कार्यकर्ते हे उमेदवार विवेक कोल्हे यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.