Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी; पंकजा मुंडेंनी १० वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल

Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी; पंकजा मुंडेंनी १० वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल

0

Legislative Council : नगर : महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील (Legislative Council) ११ जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया झाली. यात २७४ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झाले. भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या विजयामुळे १० वर्षांनी विजयाचा गुलाल खेळला.

Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी; पंकजा मुंडेंनी १० वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल
Legislative Council : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी; पंकजा मुंडेंनी १० वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल

११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात

११ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते. यात विजयासाठी २३ मतांची उमेदवारांना गरज होती. भाजपच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. शिवसेनेच्या शिंदे गटातील भावना गवळी यांनी २४ तर कृपाल तुमाने यांना २५ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या राजेश विटेकर यांना २३ तर शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या २५ मतांनी विजयी झाल्या तर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर २४ मतांनी विजयी झाले. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना १२ मते मिळाल्याने ते पराभूत झाले.

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण (Legislative Council)

या मतदानातून महाविकास आघाडीतील १० मते फुटले असल्याचा आरोप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसची मते फोडल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या विजयामुळे मुंडे समर्थकांत मोठे उत्साहाचे वातावरण आहे. १० वर्षांनंतर त्यांनी विजयी गुलाल खेळला. पंकजा मुंडे यांना मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकांत पराभव पाहावा लागला होता. त्यामुळे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मुंडे समर्थकांकडून होत होती. भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांना विजयी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here