Leopard : बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

Leopard : बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

0
Leopard : बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन
Leopard : बिबट प्रवण क्षेत्रात ऊसतोड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन

Leopard : अहिल्यानगर : जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard) वावर असल्याने आणि सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला असल्याने ऊसतोड (Cane Cutting) करत असताना शेतकरी व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक (Deputy Conservator of Forests) धर्मवीर साळविठ्ठल यांनी केले आहे.

नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे

ऊसतोड सुरू असताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते. मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते. खूप वाकुन ऊसतोड करू नये. अशा वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो. ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्लूटूथ स्पीकरचा वापर करुन मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत, यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते.

अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार

समूहाने कामे करावीत (Leopard)

ऊसतोड किंवा शेतीची कामे करत असतांना समूहाने कामे करावीत. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये, त्यांना दगड मारून पळवण्याचा प्रयत्न अथवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. बिबट तसेच बिबट्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ सबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी याच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.