Leopard : नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

Leopard : नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

0
Leopard : नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
Leopard : नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

Leopard : राहुरी : राहुरी तालुक्यातील वडनेर परिसरात काल पहाटेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार करणारा नरभक्षक बिबट्याला (Leopard) वन विभागाने (Forest Department) २४ तासांच्या आत जेरबंद केले. त्यामुळे वडनेरसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय

तात्काळ जेरबंद करा, अशी केली होती मागणी

वडनेर येथील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे (वय ५०) यांच्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते. वडनेर-ताहाराबाद रस्त्यावर असणाऱ्या गव्हाणे वस्ती येथील शेतकरी गव्हाणे हे काल (ता. १०) पहाटे ४ वाजेच्या दरम्यान, मकाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेजारीच दबा धरून बसलेला बिबट्याने गव्हाणे यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात बिबट्याने त्यांना जागेवर ठार केले होते. या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा, अशी मागणी केली होती. 

अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण

शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास (Leopard)

वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ पथक रवाना केले. या भागात टॅब कॅमेराही बसविण्यात आला होता. अखेर आज पहाटे नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा वर्षांचा हा बिबट्या असून सध्या डिग्रस येथील नर्सरीत ठेवण्यात आला आहे. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात या नरभक्षक बिबट्याला दाखल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here