Leopard : वनविभाग-ग्रामस्थांच्या वादात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पुन्हा निसटला 

Leopard : वनविभाग-ग्रामस्थांच्या वादात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पुन्हा निसटला 

0
Leopard : वनविभाग-ग्रामस्थांच्या वादात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पुन्हा निसटला 
Leopard : वनविभाग-ग्रामस्थांच्या वादात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पुन्हा निसटला 

Leopard : राहुरी : तालुक्यातील कुरणवाडी शिवारात आज (ता.२०) पहाटे वनविभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (Leopard) अडकला. मात्र, ग्रामस्थ व वनविभागात झालेल्या वादावादीत हा बिबट्या पिंजऱ्यातून पुन्हा निसटला. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यामुळे बाहेर असलेल्या तीन बिबट्यांनी धडका देत पिंजऱ्याच्या दरवाज्याचा लाॅक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतली. दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 

अवश्य वाचा १० कोटीसाठी अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याचा खून

पिंजऱ्याबाहेर आणखी तीन-चार बिबटे

कुरणवाडी शिवारात चार-पाच बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातील एक बिबट्या आज पहाटे एक वाजेच्या दरम्यान वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र, अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर आणखी तीन-चार बिबटे घिरट्या घालत असल्याचे शेतकऱ्यांनी बघितले. त्यामुळे दुसरे बिबटे पकडण्यासाठी तत्काळ या ठिकाणी पिंजरे लावावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यानंतरच पकडलेला बिबट्या घेऊन जा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने ग्रामस्थ आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.

नक्की वाचा : दरोड्याच्या तयारीत असलेले १० आरोपी गजाआड

पकडलेला बिबट्या पुन्हा निसटल्याने वन विभागाची चांगलीच दमछाक (Leopard)

मात्र, काही वेळातच पकडलेल्या बिबट्या शेजारी पिंजऱ्याबाहेर पुन्हा तीन बिबटे आले आणि त्या बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाज्याला धडका देत पिंजऱ्याचा लाॅक वाकून अडकलेला बिबट्याची सुटका करून घेतली. पकडलेला बिबट्या पुन्हा पिंजऱ्यातून निसटल्याने वन विभागाची देखील चांगलीच दमछाक झाली. सदर ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याचे लाॅक व्यवस्थित नसल्यानेच बिबट्या पिंजऱ्यातून निसटला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.