Leopard : बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारण्याची खा. नीलेश लंके यांची केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे मागणी

Leopard : बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारण्याची खा. नीलेश लंके यांची केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे मागणी

0

Leopard : अहिल्यानगर : बिबट्याचा (Leopard) मानवी वस्तीतील वावर व होणार हल्ले यावर उपायोजना करण्यासाठी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे (Union Minister) मागणी केली होती. त्यानुसार शासनाच्या ५०० एकर जमिनीवर तटबंदी करून बिबटयांसाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाईल. मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील अशी ग्वाही मंत्री भुपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी खा. लंके यांना दिली.

नक्की वाचा : लोकसभेत मंजूर झालेल्या ‘वक्फ बोर्ड’ विधेयकाला विरोध का ?

खा. लंके यांनी मंत्री यादव यांना निवेदन केले सादर

अहिल्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या व माणसांवर होणारे वारंवार हल्ले यावर उपाययोजना करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी केंद्रीय वन मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी संरक्षीत क्षेत्र उभारण्याची ग्वाही दिली. खा. लंके यांनी शुक्रवारी यादव यांची भेट घेतली. यावेळी खा. लंके यांनी मंत्री यादव यांना निवेदन सादर केले.
अवश्य वाचा : रस्त्याच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण; गुन्हा दाखल

त्यात नमुद करण्यात आले आहे की, (Leopard)

सहयाद्री पर्वत रांगेत तसेच महाराष्ट्राच्या अन्य पठारी व पर्वतीय भागांत बिबट्यांची संख्या झपाटयाने वाढत असून ते नरभक्षक होत आहेत. त्यातून वन्यजीव व मनुष्यामध्ये संघर्ष होत आहे. वन्य प्राण्यांकडून शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच जंगल क्षेत्रात राहणारे आदीवासी यांना मारण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात उस शेतीचे क्षेत्र अधिक आहे. उस क्षेत्र बिबट्यांना लपण्यासाठी तसेच प्रजणनासाठी सुरक्षित आहे. त्यातून बिबट्यांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्यासाठी बिबटयांची नसबंदी करण्यासंदर्भातील योजना राबवावी. त्यामाध्यमातून बिबट्यांची संख्या नियंत्रीत ठेवण्यास मदत होउन मानव व वन्यजीवांमधील संघर्ष कमी होउ शकेल, जीवन आणि मालमत्तेचे नुकसान होणार नाही असा विश्वास खा. लंके यांनी या निवेदनात व्यक्त केला आहे.