Leopard | श्रीगोंदा : श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील वांगदरी गावात बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यासाठी आलेल्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याने धूम ठोकली, असा आरोप वांगदरी गावच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे वांगदरी व इनामगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : भारत-फ्रान्समध्ये आज राफेल करार;२६ राफेल सागरी विमानांची खरेदी होणार
बिबट्या दबाधरून बसला होता (Leopard)
वांगदरी येथील पोपट किसन राऊत यांच्या शेतातील पाण्याच्या सिमेंटी पाईपमध्ये बिबट्या दबाधरून बसल्याचे दिसून आले. याबाबत संबंधित शेतकऱ्याने गावातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना ही माहिती देत श्रीगोंद्याच्या वनविभाग अधिकाऱ्यांना बिबट्याची माहिती दिली.
अवश्य वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका;घेतले ५ मोठे निर्णय
अन् बिबट्या पसार (Leopard)
श्रीगोंद्याचे वन अधिकारी आणि कर्मचारी बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा पाईपच्या एका तोंडातून लावला. मात्र, त्याच दरम्यान बिबट्या सावध होऊन पाईपच्या दुसऱ्या बाजूने धूम ठोकत इनामगावच्या दिशेने पलायन केले.
वांगदरी गावच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या बाजूने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी जाळी लावली असती तर बिबट्या निश्चितच जेरबंद झाला असता. मात्र, वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा हलगर्जीपणा केल्यामुळे बिबट्याची सुटका झाल्याचा आरोप वांगदरी गावच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
जवळच असलेल्या इनामगाव येथील नलगे मळा परिसरात बिबट्याने दोन दिवसापूर्वी एका वृद्ध महिलेवर रात्रीच्या वेळी हल्ला करून बळी घेतला होता. या घटनेने परिसरातील नागरिकांनी बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत घेतली आहे. इनामगाव वांगदरीच्या हद्दीवर घोड नदी तसेच उसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्यांना वावरण्यास सोयीची जागा आहे. येथे बिबट्यांची संख्या जास्त असण्याची शक्यता असल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली.