Leopard : बिबट्यांची बनावट पोस्ट; वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सायबर पोलिसांकडे तक्रार

Leopard : बिबट्यांची बनावट पोस्ट; वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सायबर पोलिसांकडे तक्रार

0
Leopard : बिबट्यांची बनावट पोस्ट; वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सायबर पोलिसांकडे तक्रार
Leopard : बिबट्यांची बनावट पोस्ट; वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांची सायबर पोलिसांकडे तक्रार

Leopard : नगर : अहिल्यानगर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ (Fear of Leopard) घातल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत, तर अनेकांनी शेतात जाणेही बंद केले आहे. तालुक्यातील जेऊर आणि परिसर, खडकी, सारोळा कासार, भोरवाडी, अकोळनेर, चिचोंडी पाटील, मांडवे, सांडवे, बुरूडगाव, भिंगार, राळेगण, रूईछत्तीसी या गावांसह अहिल्यानगर शहरातील काही भागात बिबट्या (Leopard) दिसल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत.

अवश्य वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक

बनावट पोस्टमुळे भीतीच्या वातावरणात भर

यामुळे परिश्रमात भीतीचे वातावरण निर्माण झाले; पण ही पोस्ट बनावट असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा बनावट पोस्टमुळे अहिल्यानगर शहर व तालुक्यात भीतीच्या वातावरणात भर पडत असल्याने वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.तालुक्यात बिबट्यांची दहशत पसरली आहे. खारेकर्जुने, इसळक येथील दुर्दैवी घटनेनंतर सोमवारी (ता. १७) खारेकर्जुने शिवारातून दोन बिबट्यांना वन विभागाने ताब्यात घेतले. मंगळवारी (ता. १८) सकाळपासून खातगाव मधील दोन बिबट्यांच्या फोटोची पोस्ट व्हायरल होत आहे. याप्रमाणेच प्रत्येक गावातील सोशल मीडिया ग्रुपवर पण बिबट्या दिसल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत.

नक्की वाचा : संगमनेर नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा खताळ विरुद्ध डॉ. मैथिली तांबे ‘दुरंगी’ लढत रंगणार

वन विभाग सुध्दा संभ्रमात (Leopard)

बिबट्यांबाबती माहिती सोशल मीडियावर येताच गावागावातून वन विभागला फोन येता, तसेच अर्ज प्राप्त होत आहेत. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर बिबट्याच्या वावराच्या कोणत्याही खुणा आढळून येत नाहीत किंवा त्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये देखील बिबट्या दिसत नाही. त्यामुळे वन विभाग सुध्दा संभ्रमात पडत आहे. अशा चुकीच्या पोस्ट जाणीवपूर्वक किंवा उत्सुकतेपोटी व्हायरल केल्या गेल्याने शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा चुकीच्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर सायबर पोलिसांकडे केली आहे.खातगावच्या फलकाजवळ दोन बिबटे दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पण फलकाजवळ बिबटे नसून ते चित्ते आहेत. आणि चित्ते आपल्याकडे कोठेही आढळून येत नाहीत. ही पोस्ट जाणीवपूर्वक भीती पसरविण्याचा हेतुन ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेली आहे. जनतेने यावर विश्वास ठेवू नये. अशा खोट्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या मूळ लोकांवर कारवाई करण्याची मागणी वन विभागाने केले आहे.