Leopard : मिरजगाव येथील कालव्यात पडलेला बिबट्या वनविभागाने केला जेरबंद

Leopard : मिरजगाव येथील कालव्यात पडलेला बिबट्या वनविभागाने केला जेरबंद

0
Leopard : मिरजगाव येथील कालव्यात पडलेला बिबट्या वनविभागाने केला जेरबंद
Leopard : मिरजगाव येथील कालव्यात पडलेला बिबट्या वनविभागाने केला जेरबंद

Leopard : कर्जत: मिरजगाव (ता.कर्जत) वनविभागाच्या (Forest Department) हद्दीतील खोल कॅनलमध्ये अडीच वर्षाची मादी बिबट्या (Leopard) पडला होता. तब्बल साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यास जेरबंद करण्यात वनविभागास यश आले असल्याची माहिती कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी दिली.

नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश

कॅनेलमध्ये मादी बिबट्या पडल्याची माहिती

एका महिन्यात कर्जत तालुक्यात तब्बल तीन बिबटे निदर्शनास आले. यापैकी दोघे जेरबंद केले असून गुरुवारी पाटेवाडी शिवारात एक बिबट्या मृत अवस्थेत मिळाला होता. मिरजगाव शिवारात वनविभागाच्या हद्दीतील एका खोल कॅनेलमध्ये अडीच वर्षांची मादी बिबट्या पडली असल्याची माहिती कर्जत वनविभागास मिळाली. यावेळी कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, मिरजगावचे संकेत उगले यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत रेस्क्यू ऑपेरशन सुरू केले. खोल कॅनेलच्या भुयारात मादी बिबट्या पाण्यात पडलेली निदर्शनास आल्यावर त्यास जेरबंद करण्यासाठी कॅनेलला जाळी लावत त्यातून पिंजरा सोडण्यासाठी मोठी कसरत पार पाडावी लागली. तब्बल साडेपाच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या मादी बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात दौंड रेस्क्यू टीम आणि कर्जत वनविभागास यश आले.

Leopard : मिरजगाव येथील कालव्यात पडलेला बिबट्या वनविभागाने केला जेरबंद
Leopard : मिरजगाव येथील कालव्यात पडलेला बिबट्या वनविभागाने केला जेरबंद

अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

जेरबंद बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी (Leopard)

जेरबंद केलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पिंजऱ्यातून डरकाळी फोडणाऱ्या बिबट्यास पाहताना नागरिकांची चांगलीच पाचावर धारण बसली होती. जेरबंद केलेला बिबट्या कर्जत वनविभागाच्या ताब्यात आहे. या रेस्क्यूसाठी नाशिक विभागाचे धर्मसाल विठ्ठल, अहिल्यानगरचे गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, संकेत उगले, वनरक्षक प्रवीण सोनवणे, सुरेश भोसले, गंगासागर मुटकुले आदी कर्मचाऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी आणि मिरजगाव पोलीस विभागाने विशेष परिश्रम घेतले.