Leopard : कोपरगाव: तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्रल्हाद जयराम जवरे यांचे वस्तीजवळ व नानासाहेब जवरे यांच्या शेताजवळ कोपरगाव वन विभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (Leopard) अडकला आहे.
अवश्य वाचा: उंबरे परिसरात रिक्षा व बसचा भीषण अपघात; तीनजण जागीच ठार
बिबट्याची तीन पिल्ले अद्याप ऊसात असल्याची माहिती
सदर परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. सदर मागणी वरुन वन अधिकारी शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी पिंजरा लावला होता. मंगळवारी (ता. ६) सकाळच्या सुमारास सदर बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या मादी बिबट्याची तीन पिल्ले अद्याप त्या ठिकाणी लक्ष्मण चंदू थोरात यांच्या ऊस पिकात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. वन विभागाने सदर परिसरात सर्च ऑपरेशन रावबून या परिसरात आणखी बिबट्या आहे का याची खात्री करून पिंजरा लावण्याची मागणी सरपंच सारिका विजय थोरात व सदस्य भाऊसाहेब थोरात, वनिता वाकचौरे, इंदुबाई शिंदे, मीना थोरात, रोहिणी वाकचौरे, किरण थोरात, दत्तू नामदेव थोरात, रामनाथ थोरात, कानिफनाथ थोरात, भाऊसाहेब साईनाथ थोरात आदींनी केली आहे.

नक्की वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी अहिल्यानगरमध्ये; युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
आतापर्यत सहा बिबट जेरबंद (Leopard)
आतापर्यत कोपरगाव तालुक्यात सहा बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून कोपरगाव तालुक्यात अजून मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



