Leopard : राहाता : तालुक्यातील दुर्गापूर येथील बिरोबा मंदिर जवळ पुलाटे वस्तीवर बिबट्या (Leopard) जेरबंद करण्यात वनविभाग (Forest Department) व प्राणीमित्र यांना यश आले. चंद्रशेखर बाळकृष्ण पुलाटे यांच्या जांभूळ बागेत बिबट्या कोंबडीच्या सावजाला आकर्षून पिंजऱ्यात जेरबंद (Arrested) झाला. चार पाच दिवसापासून हा बिबट्या पिंजऱ्याभोवती फिरत होता, पण पिंजऱ्यात जात नव्हता. परंतु काल सोमवार (ता.० ९) रोजी पहाटे कोंबडीला आकर्षून तो पिंजऱ्यात अलगद अडकला.
हे वाचा: साईबाबा संस्थानला साईभक्ताने देणगी स्वरूपात स्कूल बस केली अर्पण
नागरिकांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक प्रतीक गजेवर व प्राणीमित्र विकास म्हस्के घटना स्थळी पोहचले व अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल,सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी मेहबूब शेख यांना माहिती देण्यात आली. आपदा मित्र अनिल जाधव, मंडू खेमनर हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जेरबंद बिबट्या हलविण्याची कार्यवाही केली. जेरबंद झालेला बिबट्या हा ११ ते १२ वर्षं वयाचा नर जातीचा आहे. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिस पाटील दिलीपराव पुलाटे, दशरथ नेहे, अनिल पुलाटे, ,लक्ष्मण पुलाटे, निखिल पुलाटे, हर्षवर्धन पुलाटे,अशोककाका पुलाटे, कोंडीराम पुलाटे यांनी मदत केली.
हे पहा: अजित पवारांचा अपघात की घात
वनविभागाचे आवाहन (Leopard)
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वन विभागाला निधी दिल्याने वनविभागाच्या माध्यमातून आता बिबट्यांचा बंदोबस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या भागामध्ये बिबट्या आढळून आल्यास त्वरित वन विभागाशी किंवा प्राणी मित्रांची संपर्क साधावा असे, आवाहन वन विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.



