Leopard | घरात घुसला व बाथरूममध्ये फसला…भिंगारमधील बिबट्या अखेर जेरबंद

0

Leopard | नगर : मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा (Leopard) मोठा वावर वाढला आहे. बिबट्या थेट आता मनुष्य वस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अहिल्यानगर शहराजवळ असलेले भिंगार शहर परिसरात आज (ता. १६) बिबट्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक हे दाखल झाले आहे.

नक्की वाचा: इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर …, अनिल कपूर आणि हरभजन सिंहने कुणाला दिला इशारा

बिबट्याने अनेकांवर हल्ले

अहिल्यानगर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार हा आढळून आला. तसेच मनुष्यवस्तीमध्ये येत बिबट्याने अनेकांवर हल्ले केले आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच आता पुन्हा एकदा शहरी वस्तीमध्ये बिबट्या आला असल्याने भीतीचे सावट निर्माण झाले आहे.

अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी

त्याला पाहताच आरडाओरड

भिंगार शहरातील वारूळवाडी परिसरात बिबट्या हा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. काही नागरिकांनी त्याला पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्या हा एका इमारतीकडे पळाला. त्यानंतर नागरिकांनी तातडीने वनविभागाला फोनद्वारे संपर्क साधत घटनेची कल्पना दिली.

हे पहा – बुधवार पेठेत पोलिसांचं सर्च ऑपरेशन का? पहा सर्वात मोठा खुलासा

बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी घराच्या छतावर गर्दी करू लागले. दरम्यान भेदरलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूम मध्ये जाऊन बसला व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नाने त्याला अखेर जेरबंद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here