Leopard : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश

Leopard : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश

0
Leopard

Leopard : संगमनेर : दुर्गापूर (ता. राहाता) येथील गुळवे वस्तीवर असलेल्या विहीरीत (well) एक ते दीड वर्ष वयाचा बिबट्या (Leopard) पडला होता. वनविभागाने (Forest Department) प्राणी मित्र आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.  

हे देखील वाचा: आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पाईपच्या आधारावर बसून होता बिबट्या (Leopard)

दुर्गापुर शिवेलगत असलेल्या दाढ हनुमंतगावं रोड लगत असलेल्या मंगल रमेश गुळवे यांची गट नंबर १६४ मध्ये विहिर आहे. या विहिरीत अंदाजे एक ते दीड वर्ष वय असलेला बिबट्या पडला होता‌. रमेश गुळवे हे शुक्रवारी (ता.२३) सकाळी मोटार चालू करण्यासाठी विहिरीवर गेले होते. यावेळी त्यांना विहिरीत गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं असता एक बिबट्या पाईपचा आधार घेऊन बसलेला दिसला. त्यांनी ही माहिती लगेच पोलीस पाटील दिलीप पुलाटे व प्राणी मित्र विकास म्हस्के यांना कळवली. विकास म्हस्के यांनी तत्काळ वनरक्षक प्रतीक गजे यांना माहिती दिली.

नक्की वाचा: नटसम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

विहीरीत पिंजरा सोडत अलगद बिबट्या जेरबंद (Leopard)

माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनपाल सानप, वनरक्षक प्रतीक गजेवर, संजय साखरे, प्राणी मित्र विकास म्हस्के, अजय बोधक घटणास्थळी दाखल झाले. यावेळी विहिरीत क्रेटच्या सहाय्याने बिबट्याला आधार देऊन विहीरीत पिंजरा सोडत अलगद बिबट्या जेरबंद करण्यात यश मिळवले. याप्रसंगी रमेश गुळवे, शांताराम पुलाटे, माणिक गुळवे , तलाठी कानडे आणि परिसरातील नागरिकांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास मोठी मदत केली. दरम्यान, परिसरात आणखी बिबटे असण्याची भीती व्यक्त करत गुळवे वस्तीवर पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here