Leopard : नगर : केडगावातील शाहूनगर परिसरात दुपारच्या सुमारास बिबट्या (Leopard) आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. एका नागरिकावर बिबट्याने हल्ला (Leopard attack) केल्याने परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहे. वनविभाग (Forest Department) सतर्क झाला असून पोलिसांकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हे देखील वाचा : बिबट्याच्या एन्ट्रीने केडगावात खळबळ: नागरिक धास्तावले
वनविभागाकडे आवश्यक साधनसामग्रीची कमतरता (Leopard)
पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवत परिसर रिकामा केला. त्यानंतर वनविभागाचं बचाव दल घटनास्थळी पोहोचलं आहे. वनविभागाचे केडगाव परिसरात पाेहचले खरे, मात्र त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक साधनसामग्री नाही. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करणार कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला हाेता.
हे देखील वाचा: आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंड्या; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
तीन ते चार तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्या जेरबंद (Leopard)
त्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठीची आवश्यक साधनसामग्री आणून केडगावातील नागरी वसाहती जवळ दबा धरून बसलेला बिबट्या वनविभागाच्या तीन ते चार तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर जेरबंद झाला आहे. त्यामुळे केडगावकरांनी खऱ्या अर्थाने अखेर सुटकेचा निःश्वास साेडला आहे.