Leopard : आला रे आला बिबट्या आला, कधी हल्ले, तर कधी हुलकावणी; ‘या’ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

Leopard : आला रे आला बिबट्या आला, कधी हल्ले, तर कधी हुलकावणी; 'या' परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

0
Leopard

Leopard : नगर : आला रे आला बिबट्या (Leopard) आला, कधी हल्ले, तर कधी हुलकावणी दिल्याच्या बातम्या नगर शहर व तालुक्यातून मागील तीन दिवसांपासून येत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण (An atmosphere of fear) परसले आहे. वनविभाग (Forest Department) सतर्क झाला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शहरातील विविध भागात तीन पिंजरे लावले आहेत.

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

तीन दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन

काल (सोमवारी) रात्री अरणगाव (ता. नगर), तसेच नगर शहरातील भवानीनगर, सारसनगर परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन, हल्ले आणि हुलकवणीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. काल सायंकाळी साडेदहा वाजता भवानीनगर परिसरातील काही युवक जेवणानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. त्यातील एकाला पथदिव्यांच्या उजेडात बिबट्याचे दर्शन हाेताच, या युवकाने वनविभागाला प्राथमिक माहिती दिली. त्यावर वनविभाग तत्काळ शासकीय तंत्रनिकेतन परिसरात दाखल झाले. या पथकाने युवकांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर भवानीनगर, डाॅक्टर काॅलनी, सारसनगर, मार्केटयार्ड चाैक, धार्मिक परीक्षा बाेर्ड परिसरात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. ही माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : नगरकरांवर पुन्हा जलसंकट; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन पिंजरे (Leopard)


सारसनगर भागातील एका युवकाने वनविभागाला बिबट्या पाहिल्याची माहिती दिली. तर आगरकर मळा व अरणगाव परिसरातही बिबट्या आढळून आल्याचे वनविभागाला सांगण्यात आले. त्यानुसार वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आगरमळा, गावडेमळा परिसरात तीन पिंजरे लावले आहे. वनविभागाने परिसराची पाहणी केली असता, त्यांनी बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले नसल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here