Leopard : नगर ः नगर शहरालगत गायके मळा परिसरात गेल्या दाेन महिन्यांपासून बिबट्याचा (Leopard) वावर असलेला बिबट्या अखेर वनविभागाच्या (Forest Department) पिंजऱ्यात जेरबंद (Imprisoned) झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास साेडला आहे.
हे देखील वाचा : मतदानावर बहिष्कार टाकू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आवाहन
दाेन महिन्यांपासून भीतीचे वातावरण (Leopard)
दरम्यान, गेल्या काही दिवसांत या बिबट्याने अनेक कुत्री आणि डुकरांचा फडशा पाडला हाेता. गेल्या दाेन महिन्यांपासून गायके मळ्यात अत्यंत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण हाेते.
नक्की वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते, तर राम मंदिर झालेच नसते : सुजय विखे
बघ्यांची माेठी गर्दी (Leopard)
त्यामुळे वनविभागाने या भागात पिंजरा लावला हाेता. काल पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बघ्यांची मात्र माेठी गर्दी झाली हाेती. आज सकाळी ११ वाजता वनविभागाची गाडी आल्यानंतर जेरबंद बिबट्याला फाॅरिस्ट व्हॅनमध्ये टाकून नेण्यात आले.