Leopard attack : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना २५ लाखाच्या मदतीचा हात

Leopard attack

0
Leopard attack

Leopard attack : नगर : संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard attack) मृत पावलेल्या संगीता वर्पे यांच्या कुटुंबियांची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी नुकतीच भेट घेऊन सांत्वन केले. शासन मदतीचा सुमारे २५ लाख रुपयांच्या मदतीचे पत्र सुपूर्द केले.

Leopard attack

नक्की वाचा: लष्करात भरतीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा जेरबंद

कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना (Leopard attack)

मंत्री विखे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून या परिसरात बिबट्यांचा असलेला वावर आणि याबबात कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीक्षेत्र आहे. शिरापूर घाटात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्याच्या तक्रारी ग्रमास्थांनी केल्या.

Leopard attack

अवश्य वाचा: खबरदार; गणेशोत्सवात तरुणींची छेड काढाल तर…!

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण (Leopard attack)

याबाबत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन वनविभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून बिबट्यांचा शोध घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट करून वनविभागाने जादा यंत्रणेचा वापर करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here