Leopard Attack : राहुरी : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय राहुरी (Rahuri) तालुक्यातील ताहाराबाद येथील रुद्र सचिन गागरे या पाच वर्षीय बालकाच्या बाबतीत आला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात (Leopard Attack) रुद्र सचिन गागरे बचावला. जीवावरच संकट जखमांवर निभावले. कानिफनाथ मंदिराजवळील वस्तीवर सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान
वडिलांसमोरच बिबट्याचा हल्ला
गावातील आठवडा बाजार करुन रुद्राचे वडील वस्तीवर घरी येत असताना मोटारसायकल जवळ रुद्र पळत आला. जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने उडी मारून पाठीवर हल्ला करून रुद्रला ओढत घेऊन चालला होता. तेव्हा त्याचे वडील गाडीवरून खाली उतरून मुलाकडे धावा करत ओरडले. त्यावेळेस बिबट्याच्या तोंडातून रुद्र निसटला व लगेच बिबटयाने रुद्राच्या पायाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरड झाल्याने बिबट्याने रुद्रला सोडून त्या ठिकाणाहून धूम ठोकली.
बिबट्याने पाळीव कुत्र्याचा पाडला फडशा (Leopard Attack)
जखमी रुद्राला तत्काळ ताहाराबाद ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांनी अहिल्यानगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारकरीता दाखल केले. बिबट्याने हल्ला केलेल्या वस्तीवर काही वेळाने परत शिकारीच्या शोधात त्याच ठिकाणी येऊन पुन्हा हल्ल्यात वस्तीवरील पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला. त्यानंतर जवळील जगताप वस्तीलगत राहत असलेली महिला स्वयंपाक करत होती. त्या महिलेवर हल्ला करण्याच्या बेतात बिबट्या असताना महिलेने घरात धाव घेतल्याने महिला थोडक्यात बचावली. बिबट्याने नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वनविभागाने येथे तत्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी अनेक महिन्यापासून केली जात होती .या हल्ल्यानंतर काल रात्री वनविभागाने येथे पिंजरा लावला.