Leopard Attack | संगमनेर : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात (Leopard Attack) एका ३४ वर्षीय तरुण ठार झाला. रामनाथ सूर्यभान गुरुकुले ( रा.सावरगाव तळ) असे मयत युवकाचे नाव आहे. गुरुकुले यांच्या छातीपासून डोक्यापर्यंतचा सर्व भाग लचके तोडत बिबट्याने खाऊन टाकला. संगमनेर (Sangamner) तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मानवी बळी जाण्याची या वर्षातली ही चौथी घटना ठरली.हिवरगाव पावसा शिवारात एका ठिकाणी एक दुचाकी उभी केलेली असून शेजारी चपला पडलेल्या आहेत आणि रक्ताचे डागही पडलेले आहेत, अशी माहिती तेथील रहिवाशांनी संगमनेर पोलिसांना दिली होती.
हे वाचा – राज्यातून गुलाबी थंडी गायब; पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता
शरीरावर अनेक ठिकाणी जखमा (Leopard Attack)
तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार अमित महाजन, आशिष आरवडे, संगमनेर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे हे देखील तेथे पोहोचले. पोलिसांनी दुचाकी उभ्या असलेल्या ठिकाणापासून काही अंतर पुढे जाऊन पाहत असताना गवताला, दगडांना रक्ताचे डाग लागलेले दिसले. त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत एकाचा मृतदेह त्यांना आढळून आला. शरीरावरील अनेक ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या होत्या. छातीपासून डोक्यापर्यंतचा भाग पूर्णतः लचके तोडून खाल्ल्याचे दिसून आले.
हेही वाचा – राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर; राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण विभाग
अकस्मात मृत्यूची नोंद (Leopard Attack)
संबंधितांची ओळख पटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता त्याचे नाव रामनाथ गुरुकुले असल्याचे निष्पन्न झाले. प्रथमदर्शनी हा प्रकार बिबट्याने केलेल्या हल्ल्यातच झाला असल्याचा कयास स्थानिक रहिवाशी, पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याशिवाय अन्य हिंस्र प्राण्याने देखील हल्ला केलेला असल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली. उत्तरीय तपासणीनंतर यावर प्रकाश पडणार आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. गणेश दादाभाऊ शिरतार (रा. सावरगाव तळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार बी. वाय. टोपले अधिक तपास करीत आहेत.