Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू

0
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू

Leopard Attack : अकोले : तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात (Leopard Attack) किसनाबाई रामहरी काळे (वय ५७) गंभीर जखमी (Seriously Injured) झाल्या होत्या. त्यांच्यावर अकोलेतील (Akole) खासगी रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर शनिवारी (ता.१४) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल

मायलेकावर केला होता हल्ला

३० मे राजी भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्याने काळे यांच्या घरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास प्रवेश करत मायलेकावर हल्ला केला होता. या हल्ह्यात किसनाबाई काळे व त्यांचा मुलगा वैभव (वय २७) असे दोघे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात बिबट्याचा पंजा लागल्याने किसनाबाई यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. डोक्यातून मोठा रक्तस्राव झाला होता. तर मुलगा वैभवच्या पाठीवर व हाताला बिबट्याचा दात लागल्याने तोही जखमी झाला होता.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी महिलेचा अखेर मृत्यू

अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली (Leopard Attack)

या घटनेची माहिती माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांना मिळताच त्यांनी अकोले वन विभागाचे धिंदळे यांना फोन केला. त्यानंतर लगेचच धिंदळे व त्यांचे सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. त्यानंतर जखमींना प्रथमोपचारासाठी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन नंतर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविले होते. तेथून पुन्हा अकोलेतील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. अखेर शनिवारी रात्री किसनाबाई काळे यांची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली.