Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात खारे कर्जुने येथील पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात खारे कर्जुने येथील पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू

0
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात खारे कर्जुने येथील पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात खारे कर्जुने येथील पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू

Leopard Attack : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने (Leopard Attack Khare Karjune) येथून घरच्यांसमोर बिबट्याने (Leopard Attack) पाच वर्षाच्या मुलीला उचलून नेले. रियांका सुनील पवार असे तिचे नाव असून आज अखेर तिचा मृतदेह सापडला आहे. वन विभागाने (Forest Department) तत्काळ बिबिट्याला ठार मारावे अशी मागणी होत आहे.

अवश्य वाचा : काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा, तर अनेकांना अद्याप प्रतीक्षा

घटनेने संपूर्ण कुटुंब गेले हादरून

खारेकर्जुने येथे शेतात काही कुटुंबे शेतमजूर म्हणून काम करत होते. शेतावर वस्ती असल्याने कुटुंबातील काही सदस्य सायंकाळी साडेसहा वाजता थंडी वाढल्याने शेकोटी करून शेकत बसले होते. त्यावेळी रियांका सुनील पवार ही पाच वर्षांची मुलगी जवळच खेळत होती. त्याचवेळी शेजारील तुरीच्या शेतातून अचानक बिबट्या आला आणि घरच्या लोकांच्या समोर रियांकाला उचलून नेले. या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.

नक्की वाचा : काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात; मुलाखतीसाठी अर्ज मागविले

अखेर चिमुकलीचा सापडला मृतदेह (Leopard Attack)

कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही हाती लागले नाही. गावातील नागरिकांना ही बातमी समजताच त्यांनी वस्तीवर मोठी गर्दी केली. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी तातडीने दाखल झाले. आज अखेर चिमुकलीचा मृतदेह सापडला असून  बिबट्याला तत्काळ ठार मारावे अशी मागणी होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.