Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती

Lieutenant

0
Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती

Lieutenant : नगर:  पाथर्डी तालुक्यातील सांगवी लोखंडवाडी येथील भूमिपुत्र, त्रिमूर्ती शैक्षणिक मिलेट्री पॅटर्न ढोरजळगाव, शेवगावचे माजी विद्यार्थी व भिंगार येथील रहिवाशी माजी सैनिक हरिभाऊ विश्वनाथ लोखंडे यांचे सुपुत्र लेफ्टनंट (Lieutenant) अतुल विजया हरिभाऊ लोखंडे (Atul Haribhau Lokhande) यांची भारतीय लष्करात (Indian Army) आर्मी ऑफिसर क्लासवनपदी नियुक्ती झाली आहे.

Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती
Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती

अवश्य वाचा: अतिवृष्टी बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- मंत्री विखे पाटील

नागरी सत्कार व अभिनंदन सोहळा

या यशाबद्दल सत्यभामा मंगल कार्यालयात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार व अभिनंदन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या प्रारंभी लेफ्टनंट अतुल यांनी दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मारुतीरायाचे दर्शन घेऊन मिरवणूक निघाली. या मिरवणूकीत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल त्रिमूर्तीनगर येथील मुख्य सैनिकी प्रशिक्षक परमेश्वर कसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बालसैनिकांचे बँडपथक व शिस्तबद्ध परेड संचलन करत व भारत मातेच्या घोषणा देत वाजत गाजत, फटाकांच्या आतषबाजीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत लेफ्टनंट अतुलच्या हस्ते अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. मुख्य गेटवर लेफ्टनंट अतुल व प्रमुख मान्यवरांचे औक्षण करण्यात आले.

Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती

नक्की वाचा: मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार

अनेक मांन्यवरांची उपस्थिती (Lieutenant)

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या सहसचिव डॉ. श्रुती आमले-घाडगे पाटील या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, लेफ्टनंट अतुलचे वडील माजी सैनिक हरिभाऊ विश्वनाथ लोखंडे व आई  विजया हरिभाऊ लोखंडे,आजोबा विश्वनाथ लोखंडे, झेबाजी कोकरे, म्हतारदेव कोकरे, दत्तात्रय काळे, त्रिमूर्ती शैक्षणिक समूहाचे सचिव मनीष घाडगे पाटील, डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉ. देविदास देशमुख, अथर्व हॉस्पिटलचे संचालक डॉ. विकास बेडके, साई एशियनचे संचालक डॉ. नितीन नागरगोजे, डॉ. अशोकराव शिंदे, डॉ. कळमकर, डॉ. पालवे, प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, प्राचार्य सोपानराव काळे, प्राचार्य शिवाजीराव काटे, नामदेव ताके, त्रिमूर्ती ढोरजळगाव संकुलाचे मुख्य प्रशासक सचिनराव कर्डिले, प्राध्यापक शरद कराड, अशोक शिरसाठ, सुमन पुणेकर, अहिल्याबाई होळकर विद्यालयाचे प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, समन्वयक डॉ.अनुराधा गोरे, वित्त व्यवस्थापक अनिता जाधव, पुणे येथील सुरेशराव खरात, सोमनाथ देवकाते, संदिप लोखंडे, पी.एस.आय.नारायण घुले आदी उपस्थित होते.

Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती
Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती

या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांची ओळख व स्वागत करून प्रा. राजकुमार इटेवाड यांनी अध्यक्षीय निवड केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.

Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती
Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट अतुलचे मामा व त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगावचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे यांनी केले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लेफ्टनंट अतुल हरिभाऊ लोखंडे यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. अशोक गाडे व प्रा. राजकुमार इटेवाड यांनी केले. हरिभाऊ लोखंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती
Lieutenant : लेफ्टनंट अतुल लोखंडे यांची भारतीय लष्करात आर्मी ऑफिसरपदी नियुक्ती