life imprisonment : जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या १९ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

life imprisonment : जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या १९ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

0
life imprisonment : जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या १९ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
life imprisonment : जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या १९ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

life imprisonment : नगर : पत्नीच्या खुनाच्या (Murder) गुन्ह्यात जन्मठेपेची (life imprisonment) शिक्षा लागलेल्या व १९ वर्षांपासून फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज (सोमवारी) जेरबंद केला. मच्छिंद्र शंकर कदम (वय ६४, रा. मांजरसुंबा, ता. नगर) असे जेरबंद आरोपीचे नाव आहे. आरोपी मच्छिंद्र कदमने १९ वर्षांपूर्वी त्याची पत्नी आशा हिचा माहेरून पैसे आणावेत यासाठी मारहाण करून विष देत खून केला होता. या प्रकरणी बाळासाहेब ससे यांच्या फिर्यादीवरून मच्छिंद्र विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

अवश्य वाचा : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

शोधून जेरबंद करण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश

पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकून घेत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मच्छिंद्रला दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालावर मच्छिंद्रने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केली. औरंगाबाद खंडपीठानेही त्याचा दोषी ठरवत जिल्हा न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली होती. तेव्हापासून तो फरार होता. त्याला शोधून जेरबंद करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिले होते. 

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात (life imprisonment)

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मच्छिंद्रला शोधण्यासाठी मांजरसुंबा येथे गेले होते. तेथे माहिती घेतली असता आरोपी मच्छिंद्र हा वारंवार ठिकाणे बदल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अधिक तपास केला असता आरोपी मच्छिंद्र हा वांबोरी शासकीय विश्रामगृहात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.