Lifetime Achievement Award : लतीका घुले यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Lifetime Achievement Award : लतीका घुले यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0
Lifetime Achievement Award : लतीका घुले यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
Lifetime Achievement Award : लतीका घुले यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Lifetime Achievement Award : नगर : संगमनेर (Sangamaner) येथील सेवानिवृत्त शिक्षिका लतीका जिजाबा घुले यांना महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ५ जानेवारी २०२५ रोजी बारामतीच्या पद्मश्री आप्पासाहेब पवार सभागृहात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे (Maharashtra Pensioners Association) अध्यक्ष एन.डी. मारणे यांंनी दिली.

अवश्य वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज

लतीका घुले यांची नाशिक विभागातून निवड

लतीका घुले यांची नाशिक विभागातून ही निवड झाली आहे. सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यांना यापूर्वी १९९९मध्ये राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी संगमनेर नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम केले. त्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या काही वर्षे संचालिकाही होत्या. प्राथमिक शिक्षकांच्या राज्य संघटनेतही त्या पदाधिकारी होत्या. संगमनेर येथील विविध सामाजिक उपक्रमांत त्या सहभागी असतात. पेन्शनर्स संघटनेकडून अनेक सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडवले.

राज्यस्तरीय मेळाव्यात पुरस्कार वितरण (Lifetime Achievement Award)

महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचा राज्यस्तरीय मेळावा ५ जानेवारीला सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. या मेळाव्यात जीवन गौरव व निवृत्त सेवा पुरस्कारांचे वितरण होईल. लतीका घुले व मधुकर साबळे यांची उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातून जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मधुकर रामजी साबळे हे नंदुरबार येथील आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातून मोहम्मद मिराखान नबीरखान, अमरावती विभागातून प्रमोद अनंतराव पातुरकर, नागपूर विभागातून वामनराव सदनजी जुआरे व रामराव श्रावण सोयाम यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.