Lifetime Achievement Award : शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

Lifetime Achievement Award : शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

0
Lifetime Achievement Award : शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत
Lifetime Achievement Award : शेंडी-भंडारदरा येथे चौघांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

Lifetime Achievement Award : अकोले : तालुक्यातील शेंडी-भंडारदरा (Shendi-Bhandardara) येथे कालकथित दादासाहेब रुपवते (Dadasaheb Rupvate) यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आयोजित धम्म यात्रेत ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव निकाळे, बन्सीभाऊ त्रिभुवन, आर. एस. अभंग व सुरेश रोकडे यांना दादासाहेब रुपवते यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Award) देऊन सन्मानित करण्यात आले.

नक्की वाचा : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खताळ यांनी वेधले लक्ष; हमीभाव देण्याची मागणी

महिलांच्या लेझीम पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सकाळच्या सत्रामध्ये भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व सर्वच महापुरुषांना अभिवादन करत कालकथित दादासाहेब, प्रेमानंद व स्नेहजा रुपवते यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. पंचशील, ध्वजरोहण व बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला; जपान येथून आलेले भंते तेरासावा व पुणे येथील नागघोष ज्यांनी उपस्थितांना धम्म देसना दिली. सुशिलाबाई रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. दुपारी यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली. यानिमित्ताने विविध गावांचे पारंपरिक वाद्य ताफे व महिलांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. आनंद देवडेकर, आमदार डॉ. किरण लहामटे व डॉ. अजित नवले यांनी आपले विचार व्यक्त केले. अ‍ॅड. संघराज रुपवते हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी (Lifetime Achievement Award)

स्वागत व प्रास्ताविक उत्कर्षा रुपवते यांनी केले. पोपट सोनवणे व विनय घोसाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी दिलीप भांगरे, विजय वाकचौरे, विनय सावंत, एम. डी. सोनवणे, सुधाकर देशमुख, सुरेश कोते, व्ही. एम. बैचे, हौसाबाई जगधने, अनुराधा आहेर, अजीज वोहरा, वैभव मोकळ, रवींद्र पवार, धम्मयात्रा ग्रामीण व मुंबई कमिटी, बहुजन शिक्षण संघ, भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल, अकोले, संगमनेर, नाशिक, अहिल्यानगर, इगतपुरी, पुणे या भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.