Lightning Strike : पारनेरमध्ये वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

Lightning Strike : पारनेरमध्ये वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

0
Lightning Strike
Lightning Strike : पारनेरमध्ये वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

Lightning Strike : पारनेर : तालुक्यातील विविध गावांमध्ये शुक्रवारी (ता.१०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास, ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने (Stormy Rain) जोरदार हजेरी लावली. यामध्ये पुणेवाडी येथे वीज पडून (Lightning Strike) शांताराम सोनवणे यांच्या आठ शेळ्या दगावल्या (Died). जवळच असलेले सोनवणे सुदैवाने बालंबाल बचावले.

हे देखील वाचा: मिशन लाेकसभा निवडणूक; प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज

आंबा पिकाचे मोठे नुकसान

दरम्यान, पुणेवाडी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हात्तलखिंडी परिसरातील ओढे, नाले या पावसाने दुथडी भरून वाहू लागले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पारनेरसह, पुणेवाडी, हत्तलखिंडी, विरोली, वडझिरे, जाधववाडी, राऊतवाडीसह विविध गावातील केशर आंब्यासह इतर सुधारीत वाणांच्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले.

नक्की वाचा: आपल्याला शेतकरी हिताचा निर्णय घेणारा खासदार पाहिजे: सुप्रिया सुळे

सुदैवाने बचावले (Lightning Strike)

पुणेवाडी येथील शांताराम सोनवणे आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली बसले होते. जवळच त्यांच्या नऊ शेळ्या चरत होत्या. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाच्या शक्यतेने सोनवणे जवळच असलेला कांदा झाकण्यासाठी गेले. तर विजांच्या आवाजामुळे घाबरलेल्या आठ शेळ्या आंब्याच्या झाडाखाली जमल्या. तेवढ्यात आंब्याच्या झाडावर वीज पडल्याने सर्व आठ शेळ्या मृत्यूमुखी पडल्या. कांदा झाकण्यासाठी गेलेले सोनवणे व दुसऱ्या झाडाखाली थांबलेली एक शेळी सुदैवाने बालंबाल बचावले. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद रेपाळे व कामगार तलाठी सपना खोचे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here