Liquor Prohibition : अकोले: येथील तहसीलदार (Tehsildar) डॉ. सिद्धार्थ मोरे यांचे अध्यक्षतेखाली शासकीय दारुबंदी (Liquor Prohibition) समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत गटविकास अधिकारी, अकोले व राजूर येथील पोलीस निरीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी (Excise Duty Officer) आणि अशासकीय सदस्य यांचा समावेश आहे.
नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण
विक्रेत्यांवर आणखी कठोर कारवाईसाठी चर्चा
तहसीलदार मोरे यांनी या समितीची स्थापना करून पहिली बैठक बोलावली. या समितीत अशासकीय सदस्य म्हणून हेरंब कुलकर्णी यांना घेण्यात आले आहे. सुरुवातीला पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या कारवायांची माहिती घेतली. त्यात पुन्हा पुन्हा गुन्हे दाखल झालेल्या विक्रेत्यांवर आणखी कठोर कारवाई होण्यासाठी काय करता येईल यावर सर्व अधिकार्यांनी चर्चा केली. अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी ज्या दुकानातून ही दारू आणली जाते, ती माहिती घेऊन त्या परवानाधारक दुकानावर कारवाई करण्याची गरज आहे व धाड पडण्यापूर्वी विक्रेत्यांना माहिती मिळते, याबाबत अधिकार्यांना स्पष्टीकरण मागितले.
अवश्य वाचा : भारत ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवणार;सुप्रिया सुळे,शशी थरूर,श्रीकांत शिंदेंवर मोठी जबाबदारी
ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा (Liquor Prohibition)
त्यानंतर तहसीलदारांनी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी पंचायत समितीने पुढाकार घ्यावा, असे सांगून पुढील एका महिन्यात तालुक्यातील सर्व प्रमुख गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन होतील असा ठराव या समितीने मंजूर केला. यापुढे दर महिन्याला समितीची बैठक घेण्यात येईल व दारुबंदी बाबत आढावा घेतला जाईल, असे सांगितले. गटविकास अधिकारी अमर काळे, अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उत्पादन शुल्क अधिकारी सहस्त्रबुद्धे, अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी व भरारी पथक सदस्य उपस्थित होते.
अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांचे प्रबोधन केले. त्यांनी इतर पर्यायी व्यवसाय सुरू करावेत, असे सांगून अवैध दारू विक्री बंद न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. यावेळी हेरंब कुलकर्णी यांनीही विक्रेत्यांचे प्रबोधन केले. या व्यवसायात कोणतीही सामाजिक प्रतिष्ठा नाही. त्यामुळे कष्ट करावे व गरीब कुटुंबाचे संसार उध्वस्त करण्यास हातभार लावू नये, असे सांगितले. यावेळी अनेकांनी या व्यवसायातून बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवली.