Liquor Shop Open : नगर : थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी जल्लोषी पार्ट्यांचे नियोजन सुरू असताना ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची (alcoholic) गैरसाेय हाेऊ नये, अशा मद्यप्रेमींसाठी आता सरकारने चिअर्स केलं आहे. नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने (Liquor Shop Open) तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क (State Excise Duty) विभागाने मद्यप्रेमींसाठी ही मोठी घोषणा केली आहे. तसंच गृह विभागाने याबाबतचे महत्त्वाचे आदेशही जारी केले आहेत.
हेही वाचा : Crime : दहावीच्या विद्यार्थ्याकडून सातवीच्या विद्यार्थिनीला गेले दिवस
राज्यभरात सध्या नव्या वर्षाच्या आगमनाचा उत्साह आहे. असं असताना राज्य सरकारने मद्यप्रेमींना खूश करणारा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला मद्यप्रेमींना खूश ठेवण्यासाठी, तसेच ऐन पार्टीच्या वेळी मद्यप्रेमींची गैरसोय होऊ नये, यासाठी मद्यविक्रीच्या दुकानांच्या वेळांना सूट दिली आहे.
अवश्य वाचा : Leopard : संगमनेरात रंगला बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार….
२४, २५ आणि ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास सरकारने मुभा दिली आहे. बिअर बारला रात्री १२ वाजेपासून पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.