नगर : सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहे. राज्यसभा (Rajyasabha) लढवण्यासाठी देखील सर्व पक्ष कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजपनं (BJP) महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजीत गोपछडे यांना समावेश आहे. भाजपकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजून उमेदवारी जाहीर झाली नाही. महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे.
नक्की वाचा : मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक
अशोक चव्हाणांना राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवारी (Rajya sabha)
अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. चव्हाण यांनी मंगळवारी(ता. १३) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल,अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली. अजीत गोपछडे हे कारसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या. त्यांना आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : सोनिया गांधी राजस्थानमधून लढवणार राज्यसभेची निवडणूक
भाजपकडून चौथा उमेदवार नाहीच (Rajya sabha)
मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपनं चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती.चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणं कठीण असल्याचे दिसल्यामुळे भाजपनं चौथा उमेदवार देण्याचं टाळलं आहे. भाजपकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
हेही पहा : बॉलिवूड अभिनेता राहुल देव झळकणार ‘शिवरायांचा छावा’ मध्ये