Literature Festival : राज्यातील साहित्यिकांच्या मांदीयाळीने अहिल्यानगरमध्ये रंगणार साहित्योत्सव

Literature Festival : राज्यातील साहित्यिकांच्या मांदीयाळीने अहिल्यानगरमध्ये रंगणार साहित्योत्सव

0
Literature Festival : राज्यातील साहित्यिकांच्या मांदीयाळीने अहिल्यानगरमध्ये रंगणार साहित्योत्सव
Literature Festival : राज्यातील साहित्यिकांच्या मांदीयाळीने अहिल्यानगरमध्ये रंगणार साहित्योत्सव

११ व १२ सप्टेंबरला राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे आयोजन; मसापच्या सावेडी उपनगर शाखेला यजमानपदाचा बहुमान

Literature Festival : अहिल्यानगर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (Maharashtra Sahitya Parishad Pune) यांच्या वतीने यंदाचे राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य नाट्यसंमेलनाचे यजमानपद अहिल्यानगरच्या मसापच्या सावेडी उपनगर शाखेला मिळाले आहे. अहिल्यानगर मध्ये दि.११ व १२ सप्टेंबरला साहित्यिकांच्या मांदियाळीने हा साहित्योत्सव (Literature Festival) रंगणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेला या संमेलनाचे यजमानपद नुकतेच बहाल करण्यात आले आहे. मसापच्या सावेडी उपनगर शाखा व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या (New Arts Commerce and Science College) संयुक्त विद्यमाने होणारे हे साहित्य संमेलन न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात हे दोन दिवसीय संमेलन संपन्न होणार आहे, अशी माहिती मसापच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी दिली.

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

याबाबत अधिक माहिती देताना नरेंद्र फिरोदिया म्हणाले,

मसापच्या सावेडी उपनगर शाखेने यापूर्वीही नगरमध्ये विभागीय साहित्य संमेलन यशस्वीरीत्या संपन्न केले आहे. तसेच वर्षभर विविध दर्जेदार साहित्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जातात. यामध्ये मराठी भाषा दिनानिमित्त काव्यवाचन, नामवंत साहित्यिकांचा गौरव, जिल्ह्यातील लेखक व कवींचा पुरस्काराने सन्मान आणि दरवर्षी वारसा दिवाळी अंकाचे प्रकाशन. या प्रमुख उपक्रमांना रसिक नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. असे विविध उपक्रम यशस्वी केल्याच्या कामाची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य शाखेने घेतली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा सावेडी उपनगर शाखेला राज्यस्तरीय संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. ही जबाबदारी उत्तमरित्या व आश्वासक भूमिकेनेच आम्ही पार पाडणार आहोत. यासाठी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.

सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर म्हणाले, दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनाची तयारी सावेडी उपनगर शाखेचे पदाधिकारी व न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या समितीने सुरू केली आहे. अहिल्यानगर मध्ये यापूर्वी झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व विभागीय साहित्य संमेलन राज्यभर गाजले होते. तोच लौकिक आम्ही या युवा नाट्य व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कायम राखू. या संमेलनामध्ये राज्यातील साहित्यिक, कवी व रसिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यात अनेक नामवंत साहित्यिक, लेखक, कवी या संमेलनास उपस्थित राहण्यास उत्सुक आहेत.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

येलुलकर म्हणाले, (Literature Festival)

दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील नामवंत प्रकाशकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यातून नगरकर वाचकांना चांगले साहित्याची मेजवानी सहज उपलब्ध होईल. या आधीच्याही साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीत नगरने नवा विक्रम नोंदवला होता. तसेच दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानीही नगरकरांना मिळणार आहे. यामध्ये ग्रंथदिंडी, भव्य दिव्य व शानदार उद्घाटन सोहळा, परिसंवाद, निमंत्रितांचे काव्य संमेलन, विशेष म्हणजे कवीकट्टा आयोजीत करण्यांत आला आहे .महाचर्चा, एकांकिका, संगीत रजनी कार्यक्रम, विविध विषयांवर परिसंवाद, जिल्ह्यातील व राज्यातील प्रख्यात कवींचे संमेलन, नाट्य क्षेत्रातील तसेच साहित्यिकांचा गौरव व प्रकट मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य, अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन सावेडी उपनगर शाखा व न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज करत आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

संमेलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मारतही साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी , प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावेडी मसाप शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव अॕड. विश्वासराव आठरे, सर्व पदाधिकारी, विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी दिली.