Pune Crime News:पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

0
Pune Crime News:पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार
Pune Crime News:पुण्यात दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार

Pune Crime News: मागील काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये (Crime) मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बदलापूर, अकोला, पुणे यासह राज्याच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. अशातच पुण्यात (Pune) दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Gender violence) केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

नक्की वाचा : दुर्गामाता दौडीत नारीलाच नाकारले,संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

पुण्यातील वानवडी भागात घडली घटना (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४५ वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडीत मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्या सोबत अश्लील चाळे केले.

अवश्य वाचा : ‘लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही’: एकनाथ शिंदे

ड्रायव्हरला अटक (Pune Crime News)

एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पीडित मुलींची प्रकृती व्यवस्थित आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणे बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल बसमध्ये होती का असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणामुळे आता पुन्हा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here