Local Body Elections: अहिल्यानगर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना कार्यक्रमात वाढ; निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

0
Local Body Elections: अहिल्यानगर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना कार्यक्रमात वाढ; निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता
Local Body Elections: अहिल्यानगर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना कार्यक्रमात वाढ; निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता

Local Body Elections : मुंबई महापालिकेने प्रभाग रचनेचे अंतिम प्रारूप ६ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. तसेच अहिल्यानगर महापालिकेने (Ahilyanagar Municipal Corporation) १३ ऑक्टोबरपर्यंत, तर नगर परिषदेच्या प्रभाग रचना अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने राज्यातील सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा : चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ;वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली  

अहिल्यानगर महापालिकेने ११ ते १६ जूनदरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, १७ व १८ जून रोजी प्राप्त जनगणनेची माहिती तपासणे, १९ जून ते ३० जून स्थळ पाहणी, १ ते ५ जुलै गुगल मॅपवर नकाशा तयार करणे, ६ ते २४ जुलै प्रभागात जागेवर जाऊन तपासणी करणे, प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर करणे, तर २५ जुलै ते ७ ऑगस्ट प्रारुप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून त्यावर समिती स्वाक्षऱ्या करणार आहेत.

अवश्य वाचा : आयसीसीचा कसोटी क्रिकेटमधील कपड्यांचा नियम काय ? नियम मोडल्यास शिक्षा काय ?  

राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव  (Local Body Elections)

८ ते १२ ऑगस्ट या कालावधीत प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागास सादर करण्यात येईल. १३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येईल. तसेच ३ ते ८ सप्टेंबरपर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, ९ ते १८ सप्टेंबरपर्यंत सुनावणीवरील शिफारशी प्राधिकृत अधिकाऱ्यांना अंतिम करुन नगरविकास विभागाला सादर करावेत. १९ ते २२ सप्टेंबर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेला प्रभाग रचना प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर करावेत. २३ ते २९ सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अहवालास मान्यता द्यावी. ९ ते १३ ऑक्टोबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करावी, असे सुधारित आदेश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.