Local Crime Branch : पाथर्डी परिसरात रस्ता लूट करणारे चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Local Crime Branch : पाथर्डी परिसरात रस्ता लूट करणारे चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0
Local Crime Branch : पाथर्डी परिसरात रस्ता लूट करणारे चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
Local Crime Branch : पाथर्डी परिसरात रस्ता लूट करणारे चार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Local Crime Branch : नगर : पाथर्डी परिसरात रस्ता लूट करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद (Imprisoned) केले. अक्षय अशोक डमाळे (वय २०, रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी), रोहित रमेश कराळे (वय २२), अभिषेक सीताराम पवार (वय १९, दोघे रा. धामणगाव, ता. पाथर्डी) व एक विधीसंघर्षीत बालक यांचा जेरबंद आरोपींत (Accused) समावेश आहे.

नक्की वाचा: राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद; राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर

चाकूचा धाक दाखवून चोरी

 १४ जून रोजी ज्ञानदेव सूर्यवंशी हे सफरचंद टॅम्पोमध्ये घेऊन मिरजगाव वरून पाथर्डीला निघाले होते. त्यांचा टॅम्पो माणिकदौंडी घाट (ता. पाथर्डी) येथे आला असता दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्या टॅम्पोवर दगडफेक केली. तसेच टॅम्पोला दुचाकी आडवी लावली. सूर्यवंशी यांच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून २२ हजार रुपये रोख व दोन मोबाईल बळजबरीने नेले. या संदर्भात सूर्यवंशी यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून घेतला.

अवश्य वाचा: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अकोलेत निदर्शने

एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, ही चोरी अक्षय डमाळे व त्याच्या साथीदारांनी केली आहे. ते सध्या पाथर्डी ते धामणगाव देवी रस्त्यावरील वनदेव डोंगरामध्ये रस्त्याच्या कडेला बसलेले आहेत. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता चार आरोपी जेरबंद करण्यात आले तर सुधीर रावसाहेब कराळे हा आरोपी पसार झाला. त्याचा शोध पथक घेत आहे. पथकाने जेरबंद आरोपींकडून पाच मोबाईल व एक दुचाकी असा एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here