Local Crime Branch : वेठ बिगारीतून तीन पीडितांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : वेठ बिगारीतून तीन पीडितांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : वेठ बिगारीतून तीन पीडितांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : वेठ बिगारीतून तीन पीडितांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : गेल्या वर्षभरापासून तीन जणांना घरामध्ये उपाशी ठेवून त्यांच्याकडून गायगोठ्यात वेठबिगारी करून घेतली जात असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) उजेडात आणली. याप्रकरणी दोघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : विद्यार्थी स्कुल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी – प्रताप सरनाईक

उपाशी ठेवुन व मारहाण करुन कामे करून घेतली

जाकिश बबड्या काळे (रा. भोसले आखाडा, बुरुडगाव रोड) व त्याचा मेव्हणा किशोर पोपट चव्हाण (रा. चोकनवाडी, अरणगाव) यांनी तीन इसमांना वेठबिगार बनवले होते. त्यांना जाकिश काळे याचे घरी ठेवले होते. त्यांना उपाशी ठेवुन व मारहाण करुन त्यांचेकडुन कामे करून घेतली जात होती. याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, अंमलदार हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, विशाल तनपुरे, रोहित येमुल, अरुण मोरे, अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, यांचे पथक तयार करुन रवाना केली.

नक्की वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

दोन वर्षांपासून वेठबिगार म्हणुन ठेवले डांबून (Local Crime Branch)

पथकाने मिळाल्या माहितीनुसार जाकिश काळे याचे राहते घरी जावुन खात्री केली असता फारुक मेहबुब शेख (वय ५५ वर्षे, रा. ताजबाग, मोमीनपुरा, ता. जि. नागपुर), कृष्णाराम रंगनाथ (रा. पामगढ, बिलासपुर, उत्तरप्रदेश), बाबुजी सुरजबल्ली (वय २५ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) असे मिळुन आले. जाकिश काळे, किशोर चव्हाण यांनी एक ते दोन वर्षांपासून बळजबरीने गायीचे गोठ्यातील काम करुन घेऊन वेठबिगार म्हणुन डांबून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. कामे न केल्यास त्यांना जेवण न देता मारहाण करुन गुलामाप्रमाणे वागणूक दिल्याचेही सांगितले. पोलिसांनी जाकिश बबड्या काळे यास ताब्यात घेतले असून, किशोर पोपट चव्हाण हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.