Local Crime Branch : नगर : खुनाच्या (Murder) गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. पाच वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, आरोपींनी कर्जत पोलीस ठाण्यातील लॉकअपचे (Lockup) गज कापून ते फरार झाले होते.
नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल
सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात
अक्षय रामदास राऊत (वय २८), चंद्रकांत महादेव राऊत (वय ३०, दोघे रा. पारेवाडी, ता. जामखेड) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कर्जत पोलीस ठाण्यातील पाच वर्षांपूर्वी लॉकअपचे गज तोडून पसार झालेले दोन संशयित आरोपी हे फुलगाव एमआयडीसी पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती
आरोपींना दिले कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात (Local Crime Branch)
पुढील तपासकमी आरोपींना कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार ह्रदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, रोहित येमूल, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.