Local Crime Branch : बिंगो ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

Local Crime Branch

0
Local Crime Branch : बिंगो ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
Local Crime Branch : बिंगो ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

Local Crime Branch : नगर : अकोले तालुक्यात सुरू असलेल्या बिंगो ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकला आहे. आरोपींकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत १६ जणांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात (Akole Police Station) गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे

नितीन निवृत्ती गायकवाड (वय. ३०, रा.इंदिरानगर, अकोले), अमोल मारुती मोहिते (वय २५, रा. इंदिरानगर, अकोले), वैभव राजेंद्र गायकवाड (वय २५, रा. कुंभारवाडा), व्हेल्सी गफुर वाघीलो (वय ३०, रा. शाहुनगर, अकोले), अक्षय बाबासाहेब सकट (वय २४, रा शिवाजीनगर), गोपी भाऊराव आवारी (वय २६, रा. धामनगाव, ता. अकोले), अरबाज मोहम्मद शेख (वय २५,रा. शिवाजी चौक, अकोले), आकाश संजय परदेशी (वय ३२, रा. कुंभारवाडा), रमेश एकनाथ फापाळे (वय ३०,रा. लिंगदेव, अकोले), अनिल बाळू पवार (वय ३५, रा. शाहुनगर, अकोले), विकास दत्तात्रय आबरे (वय.२९, रा. गणोरे), खंडू केरु सदणीर (वय २८, रा. खिरवीरे), शंशीकांत मुरलीधर बेनके (वय ३०, रा. खिरवीरे, अकोले), अशोक राजेंद्र जगताप (वय २५, रा. शिवाजी महाराज चौक, अकोले), गणेश हौसराव साबळे (रा. अकोले), अतुल जालिंदर नवले (रा. अगस्ती आगार, अकोले, ता.अकोले, जि. अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

पथकाने सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Local Crime Branch)

त्यांच्याकडून ४ लाख ९८ हजार ७०० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य साधनांसह ऑनलाईन बिंगो, मटका, व डॉलर नावाचा जुगारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील शहर बसस्थानकासमोर नवले कॉम्प्लेक्स मधील एका गाळ्यामध्ये काही लोक ऑनलाईन बिंगो, मटका व डॉलर नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, आकाश काळे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.