Local Crime Branch : पाथर्डीत मावा अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा;२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

Local Crime Branch : पाथर्डीत मावा अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा;२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

0
Local Crime Branch : पाथर्डीत मावा अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा;२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत 
Local Crime Branch : पाथर्डीत मावा अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा;२५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

Local Crime Branch : नगर : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, माणिकदौंडी परिसरात अवैध मावा अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने छापा टाकून २५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पाच जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे. 

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

संशयित आरोपींची नावे

शुभम विकास पारखे (वय २८, रामगिरीबाबा टेकडी, पाथर्डी), रियाज नजीर बेग (वय ३०, रा. चिंचपूर रोड , पाथर्डी), अनिल भाऊ काळोखे वय २५, रा. कोरेगाव रोड , पाथर्डी, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर आदित्य भस्करे (रा. एमआयडीसी, जि. बीड), हा पसार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

२५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)

संशयित आरोपींकडून सुगंधीत तंबाखू, सुगंधीत तयार मावा, तयार करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री असा एकूण २५ लाख ४८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, तसेच माणिकदौंडी परिसरात अवैध मावा कारखाना सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, सागर ससाणे यांच्या पथकाने केली.