Local Crime Branch : गांजासह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : गांजासह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : गांजासह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : गांजासह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (Local Crime Branch) दिले होते. त्यानुसार पथकाने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातून विक्रीसाठी चाललेला ११ किलो गांजा, असा एकूण १३ लाख ७० हजार ५०० रुपायंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत चौघांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे

सतीश सुरेश डोळस (वय २७, रा. कान्हेफाटा, ता. मावळ, जि. पुणे), राकेश सुदाम वाळुंज (वय ३४, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे), आकाश देविदास जंगम (वय २९, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे), सतीश कृष्णकुमार बिडलांग (वय ३३, रा. कारला, ता. मावळ. जि. पुणे),असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर सूरज आसराजी छाजेड (रा. बालमटाकळी, शेवगाव, जि. अहिल्यानगर), (पसार) यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले (Local Crime Branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार बालमटाकळी (ता. शेवगाव) यांच्याकडून अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन विक्री करिता शेवगाव येथुन पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पाथर्डी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, संतोष खैरे, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ यांच्या पथकाने केली.