Local crime branch : कापूरवाडीत जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local crime branch : कापूरवाडीत जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local crime branch : कापूरवाडीत जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local crime branch : कापूरवाडीत जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local crime branch : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी परिसरात जबरी चोरी (Theft) करणारे दोन संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना पुढील तपासकामी भिंगार कॅम्प पोलिसांच्या (Bhingar Camp Police) ताब्यात देण्यात आला आहे.

अवश्य वाचा: अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार मदत : पंकजा मुंडे

दोन लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे (वय २४, रा. जेऊर हैबती, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), सुदाम विक्रम जाधव (वय २९, रा. सुलतानपूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत. तर पसार झालेला फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा) याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीचे दागिने कुकाणा येथील सोनारास व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजार व सोन्याचे दागिने ७० हजार असा एकूण दोन लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

नक्की वाचा : असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत 30 सप्टेंबरला नगर येथे बैठक

सापळा रचून आरोपीस घेतले ताब्यात (Local crime branch)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार कापूरवाडी येथे जबरी चोरी करणारे संशयित आरोपी हे नेवासा तालुक्यात विठ्ठल तुपे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. यातील तुपे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, भगवान थोरात, सुनील मालणकर, भगवान धुळे, अर्जुन बडे यांच्या पथकाने केली.