Local Crime Branch : नगर : शिर्डी (Shirdi) परिसरातील एका हॉटेलमध्ये गोळीबार झाला होता. या प्रकरणात संशयीताला सोडून देण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील (Local Crime Branch) पोलीस नाईक संदीप चव्हाण याने दीड लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या संदर्भात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) पोलीस नाईक चव्हाण याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस (Police) ठाण्यात आज गुन्हा दाखल केला आहे.
नक्की वाचा: ‘मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात,पण अरबी समुद्रात स्मारक होत नाही’- मनोज जरांगे
हॉटेलच्या पार्किंगमध्ये झाला होता गोळीबार
शिर्डी येथे २२ मार्चला एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये गोळीबार झाला होता. या प्रकरणी तक्रारदाराच्या भावाला ताब्यात घेतले होते. त्याला या प्रकरणातून सोडून देण्यासाठी संदीप चव्हाणने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. संदीप चव्हाणने तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.
अवश्य वाचा: अरेच्चा! शेतकऱ्याने शेळ्यांसाठी शिवला रेनकोट
लंके यांचे उपोषण सुरू असतानाच ही कारवाई (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेतील गैरप्रकारांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर खासदार निलेश लंके यांचे उपोषण तीन दिवसांपासून सुरू असतानाच आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेतील कारभाराबाबत लंके समर्थकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.